सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘दोस्ती अनोखी’ या नव्या मालिकेत दिसणार ज्येष्ठ अभिनेता राजेंद्र गुप्ता

New Update
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘दोस्ती अनोखी’ या नव्या मालिकेत दिसणार ज्येष्ठ अभिनेता राजेंद्र गुप्ता

गेली अनेक वर्षे सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन ही वाहिनी भारतीय प्रेक्षकाच्या जिव्हाळ्याच्या विषयांना स्पर्श करणार्‍या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून सुसंबद्ध कंटेन्ट देत आली आहे. सोनीवरील आगामी मालिका जगन्नाथ और पूर्वी की ‘दोस्ती अनोखी’ प्रेक्षकांना प्रसन्नतेचा अनुभव देणारे, जीवनाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन देणारे कथानक घेऊन येत आहे. बनारसच्या सुंदर घाटांच्या पार्श्वभूमीवरील ही मालिका प्रेक्षकांना जगन्नाथ मिश्रा या वृद्ध सद्गृहस्थाच्या जीवनप्रवासाचे दर्शन घडवणार आहे. जीवनात काहीच उद्देश शिल्लक न राहिलेल्या जगन्नाथ मिश्राला पूर्वी नावाच्या एका तरुण, नवख्या मुलीच्या रूपात मैत्रीण सापडते आणि जीवनाचा उद्देशही सापडतो, अशी ही गोष्ट आहे. हृदयस्पर्शी मैत्रीची ही कहाणी जगन्नाथ मिश्रा या 72 वर्षीय कडक आणि काहीशा विक्षिप्त अशा वृद्ध सद्गृहस्थाच्या माध्यमातून सादर करणार आहे ज्येष्ठ आणि गुणी अभिनेता राजेंद्र गुप्ता.

publive-image

आपल्या व्यक्तिरेखेविषयी राजेंद्र गुप्ता म्हणतो, “काहीशा विरामानंतर टेलिव्हिजनवर पुन्हा येताना आणि ते देखील ‘जगन्नाथ और पूर्वी की दोस्ती अनोखी’ सारख्या मालिकेतून येताना फारच छान वाटते आहे. माझ्या अंतःकरणात टेलिव्हिजनचे विशेष स्थान आहे, कारण मी माझी कारकीर्द टेलिव्हिजनवरूनच सुरू केली होती आणि आज मी जो आहे, तो टेलिव्हिजनमुळेच आहे. या वर्षांमध्ये टेलिव्हिजनचा कंटेन्ट बदलला आहे. आता अधिक विचार-प्रवण आणि वेधक कथानके पडद्यावर साकार होऊ लागली आहेत. या टप्प्याचा मी साक्षीदार असल्याचा मला आनंद वाटतो. दोस्ती अनोखी ही एक फारस लोभस, आगळीवेगळी गोष्ट आहे. यातून एक वृद्ध माणूस आणि पूर्वी नावाची एक तरुण मुलगी यांच्यातील सुंदर आणि अनोख्या मैत्रीची कहाणी सांगितली आहे.ते दोघे एकमेकांकडून जीवनाविषयीच्या वेगवेगळ्या गोष्टी कसे शिकतात हे यात दाखवले आहे. ही मालिका तुम्हाला मोहित करेल आणि हसवेल देखील.रजिता शर्मा, विवेक बुडाकोटी आणि सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनसोबत काम करणे ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे.माझ्याकडे चालून आलेली ही एक सुंदर संधी आहे आणि मी ही मालिका प्रदर्शित होण्याची उत्सुकतेने वाट बघत आहे.”

जगन्नाथ और पूर्वी की ‘दोस्ती अनोखी’ मालिका 7 फेब्रुवारी रोजी सुरू होत असून दर सोमवार ते शुक्रवार रात्री 9:30 वाजता ती सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरून प्रसारित करण्यात येणार आहे!

Latest Stories